Friday, 19 January 2018

संक्रांतिनिमित्य महिला संमेलन रविवारला


लाखनी,दि.19ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी येथे स्व इंदिराबाई लाखनीकर स्मृति प्रीत्यर्थ महिला संमेलन दि २१ जानेवारी रोज रविवारला दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उदघाटक म्हणून सौ अनुराधा राजेश काशिवार, अध्यक्षा म्हणून नगराध्यक्ष नगरपरिषद साकोली सौ धनवंता राऊत व प्रमुख उपस्थितीत डॉ सोनाली भांडारकर, सभापती साधना वंजारी, व सरपंच संजीवनी नान्हे उपस्थित राहणार आहे. यात महिलांना आरोग्य विषय मार्गदर्शन केले जाणार असून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासोबतच सुप्रसिद्ध एकपात्री नाटककार आणि अभिनेत्री मृणाली शिवणकर ह्यांच मी जिजाऊ बोलते व चेतना तळवेकर हिचे स्वच्छता अभियान याविषयावर एकपात्री एकांकिका सादर केली जाणार आहे तरी नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी द्वारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...