Wednesday 19 July 2017

धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा



बिजींग, दि. 19 - चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना पक्षातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपला धर्म सोडावा लागणार आहे. चीनमधले मार्क्सवादी नास्तिक असून ईश्वराला मानत नाहीत. धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा असे चीनमधल्या धार्मिक बाबींचे नियमन करणा-या सरकारी विभागाने सांगितले आहे. ग्लोबल टाइम्समध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 
 
चायनीस कम्युनिस्ट पार्टी ईश्वराला मानत नाही. पण चीनच्या संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पक्ष सदस्यांनी कुठल्याही धर्माचे पालन करु नये असे वँग झ्युओअॅन यांनी म्हटले आहे.  ते धार्मिक विषयांवरील प्रशासकीय समितीचे संचालक आहेत. 
 
वँग यांचे विचार पक्षाच्या नियमांना धरुन आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणानुसार त्यांच्या 9 कोटी सदस्यांना कुठल्याही धर्मावर विश्वास ठेवण्यास मनाई आहे. धार्मिक संघटनेशी संबंधित असलेल्या सदस्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. वँग यांनी त्याच नियमांची आठवण करुन दिली आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...