Friday 14 July 2017

महिलांना प.बंगालमध्ये पाठवा 15 दिवसांत बलात्कार होईल - भाजपा नेत्या



कोलकाता, दि. 14 - पश्चिम बंगालच्या भाजप नेत्या रुपा गांगुली यांनी महिलाविषयी अभद्र व वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करणाऱ्यांनी आपल्या घरातील स्त्रीला पं. बंगालमध्ये पाठवायला हवे. रुपा गांगुलीने असा दावा केला आहे की, पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्याशिवाय येणाऱ्या महिलांवर 15 दिवसांच्या आत बलात्कार होईल.
रूपा गांगुली माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, जे व्यक्ती ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करतात त्यांनी मुलगी, बहीण, सून किंवा बायकोला पं. बंगालमध्ये पाठवून पहायला पाहिजे, त्यांच्यावर 15 दिवसांत बलात्कार न झाल्यास मला सांगा.
रुपा गांगुलीनं केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गांगुली यांच्या वक्तव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या आठवड्यात पं. बांगालमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी रुपा गांगुली प्रकाशझोतात आल्या होत्या. फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याचप्रकरणावर रुपा गांगुली यांच्या एका समर्थकाने फेसबुक आपत्तीजनक पोस्ट करत त्यांना टॅग केलं होतं. यावर गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...