RBI ने जारी केली प्रिंटिंगची ऑर्डर

नवी दिल्ली-भारतीय रिजर्व बॅंक लवकरच 200 रुपयांची नोट जारी करणार आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनुसार, या नोटांच्या प्रिंटिंगची ऑर्डर जारी करण्यात आली आहे. या निर्णयाशी संबंधित एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षीच मार्चमध्ये अर्थमंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांची नोट जारी करण्याचा निर्णय घेतला होता.
लवकरच जारी होणार सूचना
सूत्रांनुसार रिझर्व्ह बँकेकडून लवकरच 200 रुपयांच्या नव्या नोटेबाबत नोटिफिकेशन जारी केले जाईल. देशात चलनाची उपलब्धता वाढवण्यासाठी 200 रुपयांच्या नोटेची प्रिंटिंग सुरू करण्यात येणार आहे.
नोटबंदीनंतर देशात चलनाचा कमतरता
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या होत्या. त्याऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणण्यात आल्या. नोटबंदीच्या या निर्णयामुळे देशात चलनाची कमतरता निर्माण झाली होती. बँका आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागू लागल्या होत्या. चलन उपलब्ध नसल्याने सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या समस्येचा पूर्णपणे निपटारा करण्यासाठीच रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment