
गोंदिया,25- गोंदिया जिल्ह्यातील जैन कलार समाजबांधवाच्या जिल्हा बैठकीचे आयोजन काल सोमवारी (ता.24) स्थानिक पिंडकेपार रोड वरील समाज भवनात उत्साहात करण्यात आले होते.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज मंडळाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. या सभेत समाजोपयोगी विषयावर चर्चा करण्यात आली. समाजाला दिशा देण्यासाठी कार्यकारी मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना समाजबांधव करीत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
समाजभवन बांधकामासाठी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या खासदार निधीतून काही निधी प्राप्त झाला आहे. याच प्रमाणे खासदार नाना पटोले यांच्या खासदार निधी व आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या निधीतून समाजभवन उभारण्याचे काम सुरू आहे.शासकीय फंडातून प्राप्त होणाऱ्या निधीनुसार बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासता यावी, म्हणून काही समाज बांधवांनी या बांधकामासाठी आर्थिक सहकार्य सु्द्धा केले आहे.
याशिवाय समाजबांधवांच्या सदस्यनोंदणीचे कार्य सुरू असून आजीवन किंवा वार्षिक सर्वसाधारण सदस्य नोंदणी करून घेण्याचे आवाहन कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment