Thursday 13 July 2017

चोरीच्या संशयावरून तरूणाला शहर पोलीसांची अमानुष मारहाण….!

गोंदिया,दि.13-शहर पोलीसांनी चोरीच्या संशयावरून गोंदिया नगरपरिषदेतच्या चतूर्थ श्रेणी कर्मचारी व छोटा गोंदिया निवासी शैलेन्द्र मोहन राऊत या २१ वर्षीय तरूणास बेदम अमानुष मारहाण केल्याचा आरोप शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मारहाणीमुळे सरळ चालता ही येऊ न शकणाèया शैलेन्द्रने सांगितले की, शनिवारी ८ जुलै रोजी संध्याकाळी बायपास रिंग रोडवर फिरत असतांना २ पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणेदार साहेब बोलवित आहेत असे सांगून शहर पोलीस स्टेशनला घेवून गेले.
यापूर्वीही पोलीस पंचनाम्यावर सही करण्यासाठी बोलवित असल्याने कुठलीही शंका न न ठेवता पोलीसस्टेशनला गेलाे असता पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शु्क्ला यांनी छोटा गोंदिया परिसरात घडलेल्या ५-६ चोरी प्रकरणातील साथीदारांची नावे सांग व चोरलेला माल कुठे ठेवला आहे अशी विचारणा केली.मला चोरीबद्दल काहीच माहित नाही मागील १ मे पासून मला कावीळ झाल्याने सध्या नौकरीवर न जाता घरीच आराम करतो असे सांगूनही त्यांनी काहीच ऐकले नाही.आणि बाजीराव व चामड्याच्या पट्याने अमानुषरित्या मारहाण केली.रात्रभर बेकायदेशीर रित्या पोलीस कोठडीत ठेवले व परत मारहाण केली.मारहाणीमुळे जांघेवर जखमा सुद्धा झाल्या.दुसऱ्या दिवशी रविवारला ९ जुलै रोजी २ दिवस विचार कर,साथीदारांची नावे सांग व चोरीचा माल दे,अन्यथा २ दिवसानंतर तुला परत अटक करू व कायद्याची अशी कलम लावू की तुला वर्षभर जमानत ही मिळणार नाही असेही म्हटल्याचे सांगितले.
अशी धमकी देवून मला घरी सोडले तसेच लहानभाऊ रिंकु राऊत यांची कोऱ्या कागदावर सही घेवून घरी सोडून निघुन गेले.पोलीसांच्या मारहाणीमुळे मला चालताही येत नाही.तसेच त्यांनी दिलेल्या धमकीमुळे माझी मानसिक अवस्था वाईट झाली असल्याचा ही आरोप शैलेन्द्र राऊत यांनी लावला आहे. पोलीसांच्या या मनमानीचा राऊत यांच्या कुटुबियांनी निषेध केला असून त्याचे नातेवाईक कमलेश रमेश राऊत व अजय चचाणे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे न्यायाची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. मारहाण करणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्याची नावे माहित नसली तरी त्यांना आपण ओळखू शकतो असा दावा शैलेन्द्र राऊत यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...