Sunday 16 July 2017

अखेर 'त्या' युवकाचा मृतदेह मिळाला


अर्जूनीमोरगाव,दि.16- काल झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिवृष्टीने चारजण पुरात अडकले होते. त्यापैकी वाहून गेलेल्या एका युवकांचे मृतदेह आज सकाळी आपदा निवारण पथकाच्या हाती लागले.
मृत युवकाचे नाव महेंद्र लांडगे, राहणार चिचोली असे आहे.
काल झालेल्या अतिवृष्टीने अर्जूनी मोरगाव तालुक्यात चांगलाच कहर केला. यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीने आपले रौद्ररूप धारण केले होते. गाढवी नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने त्या पुरात चारजण अडकले होते. बचाव कार्यासाठी तालुका प्रशासनाने गोंदियाच्या आपदा निवारण पथकाला पाचारण केले होते. या पथकाने तीन जणाची पुरातून सुखरूप सुटका केली, परंतु, चिचोली येथील महेंद्र लांडगे नावाचा युवक पुरात वाहून गेल्याने बचाव पथकाने त्याची शोधमोहीम राबविली. अखेर महेंद्रचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले.  महेंद्रच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून चिचोली गावात शोककळा पसरली आहे.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...