Saturday 8 July 2017

ब्लॉसम शाळेत गुरु महोत्सव उत्साहात साजरा

देवरी: ०८ स्थानिक आईएसओ मानांकन ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त गुरु महोत्सव २०१७ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे, संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल, नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, विश्वप्रित निकोड़े, स्वप्निल पंचाभाई, सरिता थोटे, हर्षदा चारमोड़े, संगीता काले, मनीषा काशीवार, प्रगति कुंडलेकर वैशाली टेटे , तूरकर, बागडे, सर्व शिक्षक उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या प्रसंगी मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी स्पर्धात्मक युग आणि विध्यार्थी जीवन या विषयावर मार्गदर्शन केला. सर्व शिक्षकाँनी मनोगत व्यक्त केला. विध्यार्थ्यानी आपआपल्या वह्यामधे ओम् तयार केला होता. सामूहिकरित्या पूजन करुण गुरु महोत्सवात सहभाग दर्शवीला.
कार्यकर्माचे सूत्र संचालन पूर्वा चाँदेवार आणि प्रेरणा बडोले यांनी केला. आभार प्रदर्शन धारणा कोल्हारे यांनी केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...