Saturday 8 July 2017

चिमूरच्या प्रभाग एकमध्ये घाणीचे साम्राज्य नगरसेविकेचे दुर्लक्ष


चिमूर,दि.08-चिमूर नगर परिषदेच्या प्रभाग एक मध्ये येत असलेल्या वडाळा ,पैकु जुनी वस्ती, आबादी वार्ड मधील रस्त्यावरील विजेच्या खांबावरील दिवे बंद पडले असून सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.घाणीमुळे पावसाळाच्या दिवसात आरोग्याची समस्या उदभवण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त करीत नगरसेविकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सूरज नरुले यांनी केला आहे.
चिमूर नप मधील प्रभाग एक मधील वडाळा जुनी वस्ती, काळकूळनगर मध्ये नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून कोणतीही नागरी सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही.त्यामुळे घराघरातील सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्यांची वाईटअवस्था झालेली आहे. या पाण्यामुळे डास व माश्यांचा प्रमाणात वाढ झाली असून पिण्याचे पाणी सुध्दा दूषित येत असल्याचे नरुले यांची तक्रार आहे. या प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका छाया कनचलवार यांना माहिती देऊनही वार्डातील समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.चिमूर नप ला दि २७ जून ला तक्रार करण्यात आली असून कारवाई मात्र झाली नसली तरी या प्रभागा च्या नगरसेविका ह्या स्थायी समिती सभापती असताना त्यांनी नियोजन का केले नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सूरज नरुले यांनी केली असून नगरसेविकेने प्रसार माध्यमाना खोटी माहिती सांगितल्याचेही म्हटले आहे.खडीकरण रस्ते हे ग्रामपंचायत काळात झालेले असून विजेचे पोल सुद्धा या पूर्वीच लावले होते मग काळकुळ नगर मधील विकास कामे गेले कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...