Sunday 9 July 2017

वैद्यकीय प्रवेशात ओबीसीवर अन्याय-देश पातळीवर २ टक्केच जागा


मेडिकल प्रवेशात २७ टक्क्यांचा नियम डावलला, ओपनमध्ये २५ टक्के जागा वळत्या
महाराष्ट्रातील २१ वैद्यकिय महाविद्यालयात देशपातळीवर ० जागा
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.9: सध्या राज्यातच नव्हे तर देशातील विविध राज्यात वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश प्रकिया नीट- सीईटीच्या निकालानंतर सुरु झाली आहे.सध्या देशपातळीवरील सुमारे १७७ वैद्यकिय महाविद्यालयाच्या १५ टक्के कोटा असलेल्या केंद्राच्या जागासांठी केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने २७ टक्के ओबीसींना फक्त २ टक्केच जागा दिल्या.तर २५ टक्के हक्काच्या जागा ओबीसींच्या अनारक्षित गटाकडे हस्तांतरीत केल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यातच एससी प्रवर्गासाठी १५ व एसटी प्रवर्गासाठी ७ टक्के जागा प्रवेशात निश्चित करुन ७६ टक्के जागा या खुल्या प्रवर्गसाठी ठेवण्यात आले आहे.देशातील १७७ वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या जागामध्ये २७ टक्के जागेनुसार १००२ जागा या ओबीसींसाठी आरक्षीत असायला हवे होते.परंतु फक्त ६८ जागा ओबीसींना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी १.८३ टक्के ऐवढी होत आहे. २७ टक्के आरक्षण असताना ओबीसींना मात्र वैद्यकीय प्रवेशात सरासरी २ टक्के आरक्षण देत २५ टक्के आरक्षणाचा हक्क हिरावून तो खूल्या प्रवर्गाला उपलब्ध करुन देण्याचे षङयंत्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने व वैद्यकीय शिक्षण परिषदेने रचले आहे.
३७११ जागांमध्ये ५५५ जागा अनुसूचित जाती, २७७ जागा अनुसूचित जमातीला त्यांच्या आरक्षणानुसार उपलब्ध करुन दिल्या गेल्या. मात्र ओबीसींना त्यांचे हक्क राष्ट्रीय पातळीवर देतांना डावलले गेले. तर खूल्या गटात २८११ जागा ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे टक्केवारी ७५.७४ टक्के ऐवढी आहे. या सर्व गोष्टीचा विचार केल्यास १५ टक्के खूल्या प्रवर्गासाठी वैद्यकीय शिक्षण प्रवेशात सरासरी ६७ टक्के जागा आरक्षीत करुन ओबीसींवर अन्याय करण्यात आला आहे.त्यातच महाराष्ट्रातील ज्या २१ वैद्यकिय महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.त्यापैकी एकाही महाविद्यालयात ओबीसीसाठी जागा राष्ट्रीयपातळीवरील १५ टक्केत ठेवण्यातच आले नसल्याचे बघावयास मिळाले.
महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयाकडे बघितल्यास पुणे येथील बीजे मेडीकल कॉलेज २३ जागा खूल्या, ४ एस.सी. व तीन जागा एस.टी.साठी, जुहू येथील १८ जागा खूल्या, ४ एस.सी., १ एस.टी., सोलापूर येथे १८ जागा खूल्या, ३ जागा एससी, व एक जागा एसटी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खूल्या २४, एससी ५ व एसटी १, औरंगाबाद मेडीकल कॉलेज १७ जागा खूल्या, ३ एससी व दोन एसटी, मुंबईच्या जेजे हॉस्पीटलमध्ये २३ जागा खूल्या, ४ एससी, तीन एसटी, अकोला येथे १७ खूल्या, तीन एससी, दोन एसटी, लातूर १८ जागा खूल्या, चार एससी, एक एसटी, चंद्रपूर १२ जागा खूल्या, दोन एससी, एक एसटी, गोंदिया मेडीकल कॉलेज ११ जागा खूल्या, तीन एससी व एक एसटी, नांदेड ११ जागा खूल्या, एससी दोन, एसटी दोन, निरज १८ जागा खूल्या, एससी ३, एसटी २, आयजीएमसी नागपूर १८ खूल्या, चार एससी, एक एसटी, एलटीएम मुंबई १७ खूल्या, ३ एससी, २ एसटी, कोल्हापूर १७ खूल्या, ३ एससी, २ एसटी, ठाणे ८ खूल्या, एक एससी, मुंबई २० खूल्या, ५ एससी, २ एसटी, धुळे ११ खूल्या, दोन एसटी, दोन एससी, यवतमाळ १८ खूल्या, तीन एससी, एक एसटी, आंबेजोगाई १२ खूल्या, दोन एससी, एक एसटी, टीएनएमसीे मेडीकल कॉलेज मुंबई मध्ये १३ खूल्या, ३ एससी, २ जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयाचा विचार केल्यास मंडल आयोगानुसार २७ टक्के आरक्षण लागू आहे. या जागांकडे नजर फिरविल्यास एकही जागा वैद्यकीय प्रवेशात ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही.यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
केंद्राकडे दाद मागणार : प्राचार्य तायवाडे
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशात देशपातळीवर ओबीसींना २७ टक्के जागा आरक्षित ठेवायला हव्या होत्या. नव्या महाविद्यालयांत जागा वाढविताना त्यातील आरक्षणही मिळणे आवश्यक होते. उलट हक्काच्या जागाही हिरावण्यात आल्या आहेत. याविरोधात केंद्र सरकारकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...