Saturday 15 July 2017

नगरसेवकांची चांदीः मानधन झाले डबल


Image result for indian currency

औरंगाबाद,दि.15 राज्यातील महानगरपालिकाक्षेत्रातील नगरसेवकांना अच्छे दिन आले असून त्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (शनिवार) घेतला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन तब्बल 25 हजार रुपये तर त्या खालोखाल "अ', "ब', "क' व ड वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना मानधन मिळणार आहे. 
नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याविषयी ठराव राज्यातील महानगरपालिकांनी घेतला होता. सर्वांत श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या 2012 मध्ये मानधनात दहा हजार रुपयांवरून 25 हजार एवढी वाढ करण्याचा ठराव घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यानुसार पत्र देखील पाठविण्यात आले होते. मात्र, नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नव्हती. "अ' प्लसवर्ग महानगर पालिकेसाठी 25 हजार, "अ' वर्ग पालिकेसाठी 20 हजार, "ब' वर्ग पालिकेसाठी 15 हजार तर "क' व "ड' वर्ग पालिकेसाठी 10 हजार असे मानधन दिल्या जाणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...