Saturday 29 July 2017

दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा-विलास गरुड


नागपूर,दि.29 : महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले.बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना राज्यसभेत सहारनपूर विषयावर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या मायावती यांनी गेल्या १८ जुलै रोजी राज्यसभेचा राजीनामा दिला. मायावती यांच्या या अपमानाचा बदला आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या सन्मानार्थ बसपातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी नागपुरातून करण्यात आली.
संविधान चौक येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना विलास गरुड बोलत होते. यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अ‍ॅड. वीरसिंग, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, अ‍ॅड. संदीप ताजने यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विश्वास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक जितेंद्र म्हैसकर यांनी केले. संचालन रुपेश बागेश्वर यांनी केले. आशिष सरोदे यांनी आभार मानले. यावेळी मंगेश ठाकरे, राजू बसवनाथे, दिलीप मोटघरे, हेमलता शंभरकर, प्रभात खिल्लारे, शहराध्यक्ष राजू चांदेकर, बाबुल डे, रमेश पिसे, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, संजय सेलोटकर, मोहम्मद जमाल, मोहम्मद इब्राहीम, शैलेंद्र यादव, जितेंद्र घोडेस्वार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...