Tuesday 1 August 2017

मुस्लिम बांधवांनी दिली मंदिराला चकाकी


 अहमदाबाद,01-गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर तिथे अनोखा बंधुभाव पाहायला मिळत आहे. बनासकांठातील धानेरामध्ये मुस्लिम बांधवांनी तेथील मंदिरांमध्ये साचलेला चिखल साफ करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्वच्छता अभियानाचे फोटो वेगाने सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
गुजरातमधील अनेक शहरं आणि गाव गेले काही दिवस पुराच्या पाण्याखाली होते. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. याचदरम्यान, अनेक वस्त्या, धार्मिक स्थळं, शाळा-कॉलेजांनाही पाण्याचा वेढा पडला होता. आता हळहळू पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर या सगळ्या भागांत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशीच काहीशी स्थिती धानेरातील मंदिरांची झाली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...