
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेवुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची 25 डीसेंबर 2018 ला दिल्ली येथील ए.पी. भवन येथे देशातील सर्व ओबीसी संघटनांची मिळून बैठक पार पडली.या बैठकीत केन्द्र सरकारला ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेकरीता निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 20 जानेवारी 2020 ला देशभरात धरणे आंदोलन घेण्यात आले. लोकसभा बजेट शेसन दरम्यान धरणे आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानुसार येत्या 23 मार्च रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर वर देशपातळीवरील धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास फेडरेशन, तेलंगणा स्टेट बॅकवर्ड क्लास वेलफेअर असो., आंध्रप्रदेश स्टेट बॅकवर्ड क्लास असो., ओबीसी महासभा मध्यप्रदेश, विश्वकर्मा समाज न्यू दिल्ली, पिछडा महासंघ, कानपुर व देशातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत.या देशव्यापी धरणे आंदोलनात ओबीसी समाजात येणार्या सर्व जातसंघटनांचे पदाधिकारी व समाजबांधवाना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जस्टीस ईश्वरैय्या, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे,महासचिव सचिन राजुकर,सहसचिव खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष बबलु कटरे,महिलाध्यक्ष सुषमा भड,युवाध्यक्ष मनोज चव्हाण,जिवन लंजे,अमर वराडे,मनोज मेंढे,कैलास भेलावे,हरिष ब्राम्हणकर,मनोज डोये,दिनेश हुकरे,उध्दव मेहदंळे आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment