देवरीकरांचाही कोविड-19 विरोधात संकल्प
सायंकाळी थाळी, शंख व टाळ्या वाजवून प्रशासनाचे मानले आभार

जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (दि.२२) जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२१) गावांमध्ये दवंडी देऊन जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनानी सुध्दा यात सहभागी होत जनता का कर्फ्यूला प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले.सोशल मीडियावरुन जनजागृतीकोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाय योजना केली जात आहे.गोंदिया,सडक अर्जुनी,गोरेगाव,आमगाव,सालेकसा,तिरोडा,अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात चांगला प्रतिसाद जनता कर्फ्यूला मिळालेला आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनता सुध्दा घराबाहेर पडली नसल्याचे वृत्त स्थानिक प्रतिनिधींकडून येत आहे.
सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव येथील आठवडी बाजार सुध्दा बंद ठेवण्यात आले होते.राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही एकही कोरोना बाधीत किंवा संशयीय रूग्ण आढळलेला नाही. मात्र जिल्हा प्रशासनातर्फेआवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी (दि.२१) तालुका स्तरावर नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घेत तालुका स्तरावरील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यातून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाकडून यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत आपली प्रतिष्ठाने न उघडण्याचे निर्देश दिले आहे.त्यातच आजपासून देशी विदेशी दारुची सर्व दुकानेही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment