Monday, 11 March 2019

शरद पवारांची माढा मतदार संघातून माघार




पुणे,दि.11(विशेष प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढा मतदार संघातून लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. कौटुंबिक पातळीवर आपण हा निर्णय घेत आहोत असे सांगण्यात आले आहे. कुटुंबातही आपण चर्चा केली. यानंतर स्वतः उभे न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील असे ठरवले. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. सोबतच, एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभे रहावे याला काही मर्यादा असाव्यात असे मला वाटते त्यामुळे मी ही निवडणूक नाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत.
मी कोणाच्याही भीतीने किंवा चिंतेने माघार घेतलेली नाही. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. एकदाही पराभव झाला नाही, त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता मी निवडणुकीला घाबरण्याचा प्रश्नच नसल्याचे पवार म्हणाले. दरम्यान पार्थ पवारांचीही मावळमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.निवडणुकीलाही सामोरे जाण्यास मला आवडले असते. मात्र, एकाच कुटुंबातल्या किती जणांनी लोकसभा लढवावी? याला मर्यादा असायला हवी. विजयसिंह मोहिते पाटील यांनाच माढ्यातून उमेदवारी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला असता त्याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही असे पवारांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...