गोंदिया,दि.२४ : शहरातील सिव्हील लाईन्स बालाजी चौक परिसरातील रहिवासी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी (दि.२४) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
आशिष भानूदास रहाणे (२०) रा.पळशी-झाशी, बुलढाणा असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.आशिष रहाणे व त्याचा मित्र विलास उईके (१९) रा.पोलीस लाईन,नागपूर हे सिव्हील लाईन्स परिसरातील संदीप नशिने यांच्या घरी भाड्याने रूम घेऊन १४ ऑगस्टपासून राहत आहेत. दोघे एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून रविवारी (दि.२४) दुपारी विलास हा आतल्या रूममध्ये झोपलेला असताना आशिषने समोरच्या खोलीत गळफास लावून घेतला. हा प्रकार उघडकीस येताच व त्याचा श्वास सुरू असल्याचे लक्षात घेत त्याला सायंकाळी ७ वाजतादरम्यान येथील वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.आशिषने नेमकी आत्महत्या कशामुळे केली कळू शकले नाही. या प्रकरणी शहर पोलिसांनी नोंद केली आहे.
No comments:
Post a Comment