गोंदिया,दि.18ः- येथील जयस्तंभ चौक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये शासकीय कार्यालये हलविण्यास सुरवात झाली असून आज सोमवारपासून(दि.18) माहिती व जनसंपर्क महासंचालनायंर्तंगत येत असलेले जिल्हा माहिती कार्यालय हलविण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारतीमधील दुसर्या माळ्यावर कक्ष क्रमांक 25 मध्ये जिल्हा माहिती कार्यालयाला जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून लोकसभा निवडणुक काळात प्रसारमाध्यमांशी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होऊ नये याकरीता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने हे कार्यालय स्थानांतरीत करण्यात आले आहे.प्रसारमाध्यमांसह सर्व शासकीय कार्यालये व जनतेने जिल्हा माहिती कार्यालयात संपर्क करण्यासाठी नव्या प्रशासकीय इमारतीमधील दुसर्या माळ्यावरील कक्ष क्रमांक 25 मध्ये संपर्क करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment