Saturday, 23 March 2019

तीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला न्याय


देवरी,दि.23- तालुक्यातील  डोंगरगाव (सावली) येथील रहिवासी तुकाराम शिवा बहेकार या 80 वर्षीय वृद्धाला 30 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढयानंतर न्याय मिळाला. त्यामुळे श्री बहेकार यांनी न्यायव्यवस्थेचे आभार मानत आपला आनंद व्यक्त केला.
सविस्तर असे की, डोंगरगाव येथील रहिवासी असलेले तुकाराम बहेकार आणि गोविंद मुनेश्वर यांच्यामध्ये घर आणि जमिनीचा वाद होता. सदर प्रकरण गोंदियाच्या दिवाणी न्यायालयात 1989 साली दाखल करण्यात आले. या वादाचा निवाडा हा सन 1994 साली श्री बहेकार यांच्या  बाजूने लावला. यावर मुनेश्वर यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली. अपिलात मात्र कनिष्ठ न्यायालयाचा निकाल मुनेश्वर यांच्या बाजूने फिरल्याने श्री बहेकार यांनी सदर प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले. यावर मा. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून श्री बहेकार यांचे बाजूने 2018 ला निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी देवरीचे दिवाणी न्यायाधीश एस ए इंगळे यांनी कार्यवाही करून घर व जमिनीचा ताबा श्री बहेकार यांना मिळवून दिला. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...