गोंदिया,दि.03 - शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने सोमवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर हे आंदोलनांतर्गत कामावर बहिष्कार घालण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर ग्रामसेवक गायकवाड यांच्यावर केलेली कार्यवाही मागे घेण्यात आली. आता ग्रामसेवकांचे महत्व प्रशासनाला कळल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी दिली आहे. दरम्यान, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या भूमिकेवर निर्णय घेण्यासाठी आज रविवारला(दि.3) दुपारी 12 वाजता मयुर लाॅन गोंदिया येथे संघटनेची सभा आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना मध्ये गोंदिया जिल्हा राज्यात दूसऱ्या क्रमांक वर होते. मात्र, एका ग्रामसेवकावर अन्यायकारक व एकतर्फी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सर्व ग्रामसेवकांनी काम थांबविल्याने दुसर्या क्रमांकावरील जिल्हा 4 दिवसातच 22 व्या क्रमांकावर गेल्याने जिल्हाप्रशासनाची नाच्चकी झाली.त्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामसेवकांचे ग्रामपातळीवरील कार्य व भूमिकेचे महत्व कळल्याने त्यांनी संघटनेसोबत केलेल्या चर्चेनंतर कारवाई मागे घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची ६४ टक्के कामे करूनही तिरोडा येथील ग्रामसेवकावर सुडबुद्धींनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.एवढेच नव्हे तर गोंदिया येथील तहसीलदारांमार्फत ६ ग्रामसेवकांनी काम करूनही काम न केल्याचा खोटा अहवाल सादर करण्यात आले होते.या योजनेत तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक व विविध कार्यकारी सेवा सोसायटी सचिवांची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र हेतूपुरस्सर ग्रामसेवकांना टार्गेट केले जात असल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आले होते.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मानद अध्यक्ष कार्तिक चौहान यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांचे नेतृत्वाखाली सचिव दयानंद फटिंग, जिल्हा पदाधिकारी लक्ष्मण ठाकरे, रामा जमाईवार, योगेश रुद्रकार, ओके रहांगडाले, परमेश्वर नेवारे, सचिन कुथे, सुभाष सिरसाम, कविता बागडे, सुषमा वाढई , सुनील पटले, सुरेश वाघमारे, पांडुरंग हरीनखेडे तालुका अध्यक्ष/ सचिव भागेश चौहान, शैलेश परिहार, ओ जी बिसेन, निघोट, बावनकुळे,शिवानंद गौतम,कुलदीप कापगते, योगेश बिसेन, राजेश रामटेके, रितेश सहारे, समरiत, पवार, बी. टी. खोटेले, तारेश कुबळे, रवि अंबादे, धर्मेन्द्र पारधी, व ईतर सर्व 325 पदाधिकारी सभासदांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment