Friday, 15 March 2019

पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात




साकोली,दि.१५: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर असलेला दुसरा चेक काढण्यासाठी एक हजार रुपयाची लाच मागणार्या पंचायत समिती साकोली येथील कंत्राटी अभियंता अमीत रामदेव लाडे याला  दि.१४ मार्चला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली. 
त्यांविरुद्ध पो.स्टे. साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सन २०१८ मध्ये तक्रारदाराच्या आईच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरवूâल मंजूर झाले होते. घरकुलासाठी शासनाकडून १,३०,००/- रुपये मंजूर झाले.घरकुलाचे बांधकाम सुरु करण्याकरिता २०,०००/- रुपयाचा पहिला चेक तक्रारदाराच्या आईच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यावर जमा करण्यात आले. घरकुलाचे पाया बांधून पायाचे पूर्ण बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र सचिव यांनी पंचायत समिती साकोली येथे सादर केले. त्यानंतर उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता दुसर्या चेक करिता तक्रारदार हे पंचायत समिती साकोली येथे गेले.कंत्राटी अभियंता अमित लाडे यांनी तक्रारदाराच्या आईच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर असलेला ४५ हजार रुपयांचा दुसरा चेक काढण्यासाठी १ हजार रुपयाची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे केली. तक्रारीच्या आधारावरुन १४ मार्चला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. आरोपीविरुद्ध पो.स्टे. साकोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक राजेश कुद्दलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक महेश चाटे, पो. नि. योगेश्वर पारधी,अश्विनी गोस्वामे, कोमल बनकर,शेखर देशकर, पराग राऊत, कुणाल कडव, सुनिल हुकरे, दिनेश धार्मिक आदींनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...