चंद्रपूर,दि.13 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंजर मोहल्यात धाड टाकून १९ लाख ६४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी विष्णू खंजर, गीताबाई खंजर, दिनेश खंजर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. खंजर मोहल्यात मोठ्या प्रमाणात दारुसाठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथक तयार करण्यात आले. दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खंजर मोहल्ल्यात धाड टाकून देशी दारुच्या १६४ पेट्टया, ओसी ब्ल्युच्या २६ पेट्टया, १० पेट्या बिअर, नंबर वन एक पेटी, ओसी ब्ल्यु बंपर पाच पेट्या असा एकूण लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख, पोलीस उपनिरिक्षक मोटेकर, दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, कुंदनसिंह बावरी, महेंद्र भुजाडे ादींनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment