Friday, 1 March 2019

आज मंत्रालयात होणार श्रीरामपूरवासीय प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यावर चर्चा

गुरुवारचीही रात्र काढणार प्रकल्पग्रस्त जंगलातच
सामाजिक संघटनानी पुरविले अन्नधान्य
 
गोंदिया,दि.२८ः मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील सौंदडजवळील वनविभागाच्या जागेवर पुनवर्सित करण्यात आलेल्या श्रीरामपुरवासियांनी आमच्या सर्वच समस्यांचे समाधान करा अन्यथा आम्हाला आमच्या गावीच जाऊ द्या हा नारा देत सोमवारपासून आपल्या मूळ गावाकडील रस्त्यावर ठाण मांडला आहे.कवलेवाडा,कालीमाती व झंकारगोंदी ही जंगलातील गावे नव्याने अस्तित्वात आलेल्या  नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आल्याने त्यांचे पुनवर्सन 7 वर्षाआधी  करण्यात आले. सोयीसुविधा मात्र पुरविण्यात न आल्याने कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारदेवी येथील सहाशेच्यावर गावकèयांनी सोमवारला गावाकडे कूच केली होती.सोमवारी निघालेल्या या गावकèयाना पोलीस व वनविभाग प्रशासनाने तारेचे कुंपन लावून वाटेतच अडविले आहे. सोमवार,मंगळवार,बुधवार व आज गुरुवारची रात्रही त्यांची जंगलातच जाणार असून जोपर्यंत ठोस निर्णय लागत नाही,तोपर्यंत परतणार नाही ही भूमिका घेतली आहे.या प्रकल्पग्रस्तांना गेल्या चार दिवसापासून वनविभागाचे उपवनसंरक्षक युवराज व वन्यजीव विभागाचे प्रकल्प संचालक समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर मंत्रालयालाही त्याची दखल घेण्याची वेळ आली असून उद्या शुक्रवारला(दि.01)मुंबई मंत्रालयात या विषयावर उच्चस्तरिय बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्या बैठकीत काय निर्णय होते,त्याकडे लक्ष लागले असून त्या बैठकीनंतरच प्रकल्पग्रस्त काय भूमिका घेतात हे ही ठरणार आहे.
बुधवारला आपल्या गुप्त दौर्यात आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी गोंदियातील एका पक्षकार्यकर्त्याच्या घरी भेटीगाठी करीत परतीच्या प्रवासाला निघाले.मात्र प्रकल्पग्रस्तांच्या ठिकाणी गेले नाही त्यांची विचारपूस केली नाही.तर त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांना पाठविले होते.त्यांनाही प्रकल्पग्रस्तांनी एैकले नाही.शेवटी मंत्रालयात वनमंत्री व अधिकारी यांच्यासोबत बैठक करुन देण्याचे पुढे करुन पुनर्वसीत श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे व इतरांना मुंबईला चर्चेसाठी पाचारण करण्यात आले.मात्र जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे या अद्यापही त्या ठिकाणी पोचलेल्या नाहीत.
उपवनसंरक्षक युवराज व नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प संचालकानी श्रीरामपूर पुनर्वसितांना आपल्या मागण्या शासनाकडे पोचविल्या आहेत.त्या मंजूर करण्याचे अधिकार आमचे नसल्याने आम्ही फक्त आश्वासन देऊ शकतो काही करु शकत नाही असे चर्चा करतांना सांगितल्याने प्रकल्पग्रस्तांनीही जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही,तोपर्यंत न हटण्याचा निर्णय घेतला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाटी, झंकारगोंदी हे ३ गाव वनपरिक्षेत्रात येत असल्यामुळे सन २०१२-१३ ला या ग्रामस्थांची पुनर्वसन  श्रीरामपूर  येथे करण्यात आले. मात्र. मोबदल्यात फक्त ८ लाख देण्यात आले आहे. उर्वरित २ लाख, शेती व पुनर्वसन प्रमाणपत्र टप्प्याटप्य्याने देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. मात्र, त्याला ७ वर्ष लोटूनही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या बिèहाडासह आपल्या मूळ ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना रोखण्यात आले. जो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत परत जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.सन २०१२-१३ मध्ये त्यांना गावातुन बाहेर काढत कोहमारा-साकोली मार्गावरील सौंन्दड जवळील ठिकाणावर पुनवर्सन करण्यात आले.
गेल्या चार दिवसापासून त्याठिकाणी शेक़डोच्या संख्येने महिलापुरुष आपल्या मुलाबांळासह ठाण मांडून बसले आहेत.पिण्याच्या पाण्यापासून अन्नधान्याची सोय आता सामाजिक संस्था करु लागले आहेत.विविध राजकीय पक्षाचे पुढारी त्याठिकाणी जाऊन त्यांची विचारपूसही करु लागले आहेत.
मंत्रालयात उद्या बैठक-उपवनसरंक्षक युवराज
पुनर्वसित श्रीरामपूर येथील प्रकल्पग्रस्तांना आपण समजवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला मागण्या आपल्यास्तरावरच्या नाहीत.त्यामुळे या मागण्यावर चर्चा करण्यासाठी उद्या मुंबई मंत्रालयात प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी ,पालकमंत्रीसह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी  यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यात काय तोडगा निघेल त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसरंक्षक युवराज यांनी दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...