गोंदिया,दि. 28 - गोंदिया येथील तहसिल कार्यालयाच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण 17 फेब्रुवारीच्या आत न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने या इमारतीचा लोकार्पण करणार , असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून दिला होता.
त्यानतंर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया जिल्ह्यातील कचारगड व तिरोडा येथील कार्यक्रमासाठी आले. परंतु, त्यांनी या इमारतीचे लोकार्पण न केल्याने आज गुरुवारला (दि.28)शिवसेनेचे गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ व जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी या इमारतीचे फीत कापून लोकार्पण केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे, सुनील लांजेवार, विधानसभा संगठक डिल्लु गुप्ता, तालुका प्रमुख अमरसिंग, युवासेना जिला समन्वयक पिंटू चंदेल, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुरेखा चौहान, उपजिल्हा नागमणि मारूबाण, तालुका महिला आघाडी गायत्री सरकार, युवा सेना अधिकारी अमोल पवार, शहर प्रमुख संजय समशेर, शहर संगठक विनित मोहिते, युवा सेना शहर अधिकारी आशु मक्कड, जिला उपसंगठक राजेश दोनोडे, गोलु डोहरे, विधानसभा उपसंगठक चैनलाल रहांगडाले, उपतालुका संगठक नरेश मेश्राम, विधानसभा प्रमुख मुन्ना आस्वले, किशन दमाहे, राजेश लिल्हारे, पिंटू कटरे, उपतालुका प्रमुख लालचंद चिखलोंडे, बबलु लिल्हारे, नितेश जायसवाल, सुनील सहारे, महिला आघाडी शहर ज्यातीराव यांच्यासह तालुका प्रमुख,शहरप्रमुख तसेच शिवसेनेच्या विविध शाखेचे आघाडीप्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment