गोंदिया,दि. 28 :- भारत निवडणूक आयोगाचे 27 फेब्रुवारी 2019 च्या पत्राच्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेवून नुकत्याच पार पाडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून 2 व 3 मार्च 2019 या दिवशी गोंदिया जिल्हयातील अर्जूनीमोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार केंद्रावर विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी 2 व 3 मार्च 2019 रोजीच्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत 18 व 19 वयोगटातील मतदार आणि दिव्यांग मतदार यांनी जास्तीत जास्त सहभागी होउुन आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खातरजमा करावी व मतदार यादीत नाव नसल्यास आपण आपल्या जवळच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जाऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 चे अर्ज भरुन दयावे. तसेच माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2018 मध्ये आपले नाव मतदार यादीत समाविष्ट,दुरुस्ती करण्यासाठी विहित नमूने भरुन देण्यात आले होते त्यांचे निवडणूक ओळखपत्र प्राप्त झाले आहे ते संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे. नागरिकांनी या विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा व या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास गोंदिया जिल्हा संपर्क केंद्रातील दुरध्वनी क्रमांक 1950 ( टोल फ्री ) वर संपर्कसाधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे
No comments:
Post a Comment