तिरोडा,दि २७- राजस्थानसह देशातील अनेक भागात लाखेपासून तयार होणाèयांना बांगड्यांना चांगली मागणी आहे. याचा विचार करता अदानी फाउंडेशनच्या प्रयत्नातून खैरबोडीतील महिलांना आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी बालाघाट येथील एका व्यापाèयाच्या माध्यमातून खैरबोडीच्या बचतगटाच्या सदस्यांना सध्या प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून लवकरच खैरबोडीच्या बांगड्या देशाच्या कानाकोपèयात पोचतील, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
राजस्थानसह देशातील अनेक भागात महिलांना लाखेपासून तयार होणाèया बांगड्यांनी भुरळ घातली आहे. यामुळे या बांगड्यांची मागणी मोठी आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाखेचे उत्पादन होते. ही बाब अदानी फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने हेरली. बालाघाट येथील बांगड्यांचे व्यापारी पारधी यांच्या सहकार्याने खैरबोडी येथील महिला बचत गटांच्या सदस्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना कच्चा माल पुरविणे आणि तयार मालाला बाजारपेठेत नेणे यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. सध्या बचत गटाला बांगड्या अधिक आकर्षक कशा तयार करता येतील, याचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. प्रत्येक सदस्याने दिवसाला ५० जोड बांगड्या तयार करणे अपेक्षित आहेत. सध्या एक सदस्य केवळ ४ जोड तयार करू शकत असल्याने त्यांना अत्यंत कमी मोबदला मिळत आहे. यामुळे महिलांमध्ये नाराजी असली तरी त्या भविष्याप्रती नक्कीच आशान्वित आहेत.
No comments:
Post a Comment