Thursday, 14 September 2017

पहिल्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा


Bullet-train-580x395


अहमदाबाद, दि. 14 – आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे असे पंतप्रधान शिंजो अबे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळयात बोलताना म्हणाले. दहावर्षापूर्वी मला भारतीय संसदेत भाषणाची संधी मिळाली होती अशी आठवण अबेनीं यावेळी सांगितली. जगातील अन्य कुठल्याही द्विपक्षीयसंबंधांपेक्षा भारत आणि जपानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि समृद्ध आहेत असे अबे म्हणाले.
शक्तीशाली जपान भारताच्या तर, शक्तीशाली भारतामध्ये जपानचे हित आहे असे मोदी म्हणाले. दुस-या महायुद्धानंतर जपानची वाताहात झाली होती. पण 1964 साली जपानमध्ये बुलेट ट्रेनचा आरंभ झाला आणि ख-या अर्थाने विकासाची सुरुवात झाली. नव्या जपानचा पूर्नजन्म झाला असे शिंजो अबे म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...