सरपंचपदावर डोळा असणाऱ्यांच्या संख्येत भर
देवरी, 29- 'सरपंच थेट जनतेतून' या पद्धतीमुळे येत्या 16 तारखेला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सदस्यपदापेक्षा सरपंच पदावर अनेकांचा डोळा असल्याचे नामांकन दाखल होण्याची अंतिम टप्प्यावरून दिसून आले. नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवसी देवरी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या 75 प्रभागासाठी असलेल्या 209 सदस्य पदासाठी 441 तर सरपंचपदासाठी 103 नामांकन दाखल झाल्याची माहिती तालुका निवडणुक अधिकारी विजय बोरुडे यांनी दिली आहे.
येत्या 16 ऑक्टोबर रोजी देवरी तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणुक होऊ घातली आहे. नामांकन पत्र भरण्याच्या पहिल्या तीन दिवसात एकही नामांकन पत्र दाखल झाले नव्हते. यावेळी नामांकनपत्र पहिल्यादा पूर्णपणे ऑनलाईन भरून दाखल करावयाचे असल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र तालुक्यात होते. अनेक ऑनलाईन फार्म भरणाऱ्या खासगी सेंटर वरील संगणक आपरेटर यांना प्रशिक्षणाच्या अभावामुळे जमेल तसे नामांकन अर्ज भरून निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना सोपविण्यात आल्याचा प्रकार सुद्धा दिसून येत होता. अनेक इच्छुक उमेदवार आपला नामांकन भरण्यासाठी दुसऱ्या लोकांना विनंती करताना दिसून आले. उल्लेखनीय म्हणजे अनेकांना ऑनलाईनच्या किचकट पद्दतीमुळे नामांकन दाखल करण्यापासून वंचित रहावे लागल्याचा प्रकार सुद्धा दिसून आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच हा थेट जनतेतून निवडून द्यावयाचा असल्याने सदस्य पदापेक्षा सरपंच पदावर अनेकांचा डोळा आहे. यासाठी तालुक्यातून 25 पदांसाठी 103 लोक इच्छुक असल्याचे दिसून आले. आपले अर्ज अवैध ठरू नये, यासाठी अनेकांनी 4-4 अर्ज भरल्याचेही निदर्शनात आले आहे. सरपंचपदाच्या तुलनेत 75 प्रभागासाठी केवळ 441 नामांकन दाखल झाले. यामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुकांवर प्रशासनाला बारीक नजर ठेवण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या
देवरी तालुक्यातील ग्रामीण राजकारण पेटले
संबंधित बातम्या
देवरी तालुक्यातील ग्रामीण राजकारण पेटले
No comments:
Post a Comment