Sunday, 24 September 2017

कर्जाची उचल न करणाऱ्यांच्या नावे कर्जाची रक्कम

IMG_20170923_122823

गोंदिया तालुक्यातील बिरसी सेवा सहकारी संस्थेचा प्रताप
जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल
गोंदिया,दि.२३-गोंदिया तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बिरसी(कामठा)येथील संस्थेच्या अध्यक्ष व सचिवानी मिळून गावातील शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल केल्याचे प्रकरण संबधित शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास गेले असता समोर आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.या सर्व प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे करण्यात आल्याची माहिती बिरसीचे सरपंच रविंद्र तावाडे यांनी पत्रपरिषदेत दिले.बिरसी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी सुमारे ५४ लाख रुपयाचे कर्ज अशाप्रकारे विनासमंती लोकांच्या नावे उचलून स्वतःच फस्त केले आहे. तावाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,भाऊलाल बनाफर यांच्यानावे ३४ हजार ४३२,कनईसिंह गहरवार यांच्या नावे ६५ हजार,उर्मिला नैकाने यानी ८ हजाराचे कर्ज घेतले परंतु त्याच्या नावे ५१ हजाराची थकबाकी मुद्दल व्याजासह दाखविण्यात आली आहे.रणजितंसिह पंडेले यांनी २००९-१० मध्ये कर्जच घेतले नाही त्या काळात ते गुजरातमध्ये असताना त्यांच्या नावे तरीही ५४ हजाराची थकबाकी दाखविण्यात आली आहे अशा अनेक शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम उचल करुन मोठ्याप्रमाणात गैरव्यहार झाल्याचे प्रकरण या कर्जमाफीच्या निमित्ताने समोर आले आहे.सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी केलेल्या या सर्व प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून संस्थेचे अध्यक्ष व सचिव सभासदांना तुमचे कर्ज पुर्ण करुन देऊ चिंता करु नका असे सांगत असल्याचेही तावाडे यांनी सांगितले.दरम्यान, याप्रकरणाबाबत संस्थेचे सचिव जी.एस.जांभूळकर यांना विचारणा करण्याकरिता भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...