Saturday, 16 September 2017

लाच घेताना लागवड अधिकारी गजाआड

गोंदिया,दि.16,- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकार्याने मजुरांच्या खात्यात जमा केलेल्या मजुरीचा मोबदला व कामावर परत घेण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या तिरोडा येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या लागवड अधिकाऱ्यास गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना शुक्रवारी अटक केली असून; पुरुषोत्तम पंधरे असे या लाचखोर लागवड अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हा वन मजूर असून सामाजिक वनीकरण विभागाच्या गोंडमोहाडी येथील रोपवाटिकेत देखरेखीचे काम करायचा,त्यांला कामावरून कमी केले असून पुन्हा कामावर घेण्या करिता सहकाय लागवड अधिकरी पुरुषोत्तम पंधरे यांने तक्रारदारास तीन हजार रुपयाची मागणी केली.लाच न दिल्यास तक्रारदाराच्या सुनेला देखील कामावरून काढून टाकण्यात येईल अशी धमकी दिल्याने तक्रारदाराने गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारला दिनकर ठोसरे यांच्या नेतृत्वातील चमूने सापळा रचून लोकसेवक पुरुषोत्तम पंधरेला अटक केली. त्याच्या विरुद्ध लाच चलुचपत प्रतिबंधक कायद्या अन्वये तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...