Thursday, 14 September 2017

उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक

d35931-large

वर्धा,दि.14- येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी संगीता गोविंद राठोड व त्यांचे पती उत्तम राजाराम चव्हाण यांना २५ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई अँन्टी करप्शन ब्यूरोच्या वतीने १३ सप्टेबर रोजी करण्यात आली.
तक्रारदार हे राजराजेश्‍वर महिला बहुउद्देशीय संस्था व्दारा संचालीत स्वयंरोजगार मेलाचे व्यवस्थापक आहे. गणपती उत्सवाचे निमित्ताने पुलगांव येथे २२ ऑगस्टपासून स्वयंरोजगार प्रदर्शनी उपविभागीय अधिकारी यांचे रितसर परवानगीने सुरू आहे. परंतु मुदत संपल्याने प्रदर्शनीची मुदत वाढविण्याकरिता तक्रारदार हे गेले असता संगीता गोविंदराव राठोड यांनी ५0 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांची रूपये देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचेकडे तक्रार केली. १३ सप्टेंबर रोजी रूपये देण्याचे ठरले होते. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिका-यांनी सापळा रचला होता. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी संगीता गोविंद राठोड यांनी ५0 हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रूपये देण्याचे ठरले होते. ही २५ हजार रूपयांची रक्कम उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांच्या वतीने त्यांचे पती उस्मानाबाद येथे शिक्षक असलेले उत्तम राजाराम चव्हाण यांनी स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. दोनही आरोपीचे विरोधात शहर पोलिस ठाण्यात कलम ७,१२, १३ (१)(ड) सहकलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात भावना धुमाळे, सुनील कळंबे, सरोज बुधे, दिप्ती मोटघरे, परसराम साही यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...