Thursday, 21 September 2017

मुल्ला शाळा प्रकरणात चौकशी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

गोंदिया,21- देवरी पंचायत समिती अंतगर्त येणाऱ्या मुल्ला येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याचे प्रकरण गेल्या जुलै महिन्यात समोर आले होते. या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी सुद्धा पूर्ण केली. मात्र, संबंधित चौकशी अधिकाऱ्याने अद्यापही आपला चौकशी अहवाल वरिष्ठांना सोपविला नसल्याने त्या चौकशी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावत आपले वेतन का थांबवण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारे पत्र दिल्याची माहिची प्रभारी गटशिक्षणाधिकीरी डी.बी. साकूरे यांनी दिली आहे.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मुल्ला येथील वरिष्ठ शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेच्या शालार्थ खात्यातील रकमेची अफरातफर केल्याची तक्रार त्याच शाळेतील कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. असे असताना शिक्षण विभागाने कर्मचाऱ्यांच्या त्या तक्रारीकडे डोळेझाक करण्याचे धोरण स्विकारले होते, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. सदर प्रकरण माध्यमातून समोर येताच चौकशीची तपासचक्रे जलद गतीने फिरविण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी कबूल केले आहे. त्याप्रमाणे शालार्थ खात्यातून पैशाची अफरातफर केल्याचे चौकशीत निष्पण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. याशिवाय शाळेत कधीही न शिकलेल्या व्यक्तींना शाळा सोडल्याचे दाखले दिल्याचेही चौकशीत स्पष्ट झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. असे असताना चौकशी अधिकारी श्री येटरे यांनी अद्यापही आपला अहवाल वरिष्ठांना सादर न केल्याने पुढील कार्यवाही थंडबस्त्यात आहे. या संबंधी चौकशी अधिकाऱ्यांना आपला अहवाल सादर न केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावत आपले माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन का थांबविण्यात येऊ नये, अशी पत्राच्या द्वारे विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षण विभागावर या प्रकरणात राज्यमंत्रिमंडळातील एका बड्या नेत्याचा दबाब येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या विषयी चौकशी अधिकारी येटरे यांचेशी प्रकरणातील सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...