पुणे,12- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय राज्य सरकार घेत नसल्याने सरकारच्या वेळकाढू धोरणाचा जाब विचारण्यासाटी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील एक लाख अंगणवाड्यांचा बेमुदत संप सुरू झाला आहे. मुंबईत आज (दि. १२) निदर्शने करण्यात येणार असून राज्यातील २ लाखांहून जास्त अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गेले वर्षभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ऑगस्ट महिना उलटला तरीदेखील मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मानधनवाढीचा ठोस प्रस्तावदेखील तयार झाला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली नाही. दरम्यान, केरळ, तेलंगणा, कर्नाटका, हरियाणा व दिल्लीसहित अनेक राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ जाहीर झाली. महाराष्ट्र मात्र त्याला अपवाद आहे. त्याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवडमधील अंगणवाड्याही बंद होत्या. या विभागातील सर्व दहाही प्रकल्प कार्यालयात निवेदने देण्यात आली. बोपोडी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातही प्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हातातच संपाची नोटीस दिली. या वेळी वैशाली गायकवाड, चंदा शिवचरण, शैलजा चौधरी या पदाधिकारी उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment