कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्यास यश
गोरेगाव, ११ - ग्राम पंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने विविध मागण्याचे पाठपुरावा शासनासमोर केल्याने लवकरच या कर्मचा-यांना वेतनश्रेणी मिळणार आहे
ग्रामपंचायत कर्मचारी यांना नगरपरिषद कर्मचा-या प्रमाणे वेतनश्रेणी लागु करणे, सेवाकाळात कर्मचारी मूत्यु पावल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्वावर सेवेत समाविष्ट करणे, भविष्य निर्वाहनिधी दरमहिण्यास ग्रामपंचायत व कर्मचारी हिस्सा जमा करणे, तसेच जी ग्रामपंचायत भविष्य निर्वाहनिधी भरणार नाही त्या ग्रामसेवकावर शासन निर्णयाप्रमाणे गुन्हा दाखल करणे, ग्रामपंचायत कर्मचारी अपघात विमा योजना १ ऑगष्ट पासुन लागु करण्यात आली असुन ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतन देयकातुन विमा वर्गणीचा पहीला हप्ता ऑगष्ट किवा सप्टेबर च्या वेतनातुन कपात करुन भरावे व त्यानंतर नियमित स्वरुपात प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी, मार्चच्या वेतन देयकातुन कपात करुन भरणा करण्याची जवाबदारी कार्यालय प्रमुखाची राहणार असे शासनाने ठरविले असुन तसे परिपत्रक ११ ऑगष्ट ला काढण्यात आल्याची माहीती युनियनचे सचीव सी डी अग्रेल यांनी दिली आहे या मागण्यांचे पाठपुरावा युनियनचे राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, गिरीश दाभाडकर, दिलीपराव डिके, धनराज तुमसरे यांनी केलेला होता या मागण्या युनियनच्या वतीने पुर्ण झाल्याने सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन धर्मराज काळसर्पे, छगणलाल अग्रेल, माधव सेऊतकर,प्रकाश रंगारी, निलकंठ कोल्हटकर, सुनिल शहारे, धर्मेंद्र सिंगाळे, तारा परसमोडे, खेमराज खांडवाये, टेबुलाल चौव्हान, व्दारकाप्रसाद कुंभलवार यांनी केले आहे
No comments:
Post a Comment