Thursday, 9 August 2018

गोंदिया जिल्ह्यात कर्मचारी ‘संप’ प्रशासन ‘ठप्प’

गोंदिया,दि.08ः- सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन राज्यातील १९ लाख सरकारी कर्मचारी विविध संघटनांच्या माध्यमातून काल मंगळवार ७ ऑगस्टपासून ९ ऑगस्टपर्यंत संपावर गेले आहे. यात जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनीही संप पुकारला असून तीन दिवसांच्या या संपात जिल्ह्यातील सुमारे 25 हजारांच्यावर कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला आहे. सर्वच शासकीय, निम शासकीय कर्मचार्‍यांसह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीदेखील संपात उडी घेतल्याने सतत दोनदिवसापासून अनेक ठिकाणच्या शाळा बंद असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे संपाच्या दुसर्या दिवसीही सर्व कर्मचारी,शिक्षक,आरोग्य सेवक,कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जिल्हा परिषदेसमोर आयोजित धरणे मंडपात आज दुसर्या दिवशी कर्मचार्यानी रक्तदान करुन आंदोलनाला वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्य कर्मचार्‍यांच्या अनेक महत्वाच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे संप पुकारण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून संबंधित अधिकाड्ढयांना निवेदन सादर करण्यात आले असतानाच येथील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अंतर्गत राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सादर निवेदनानुसार सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्‍वासनानुसार तत्काळ लागू करण्यात यावी, अंशदायी पेंशन योजना रद्द करुन जुनी पेंशन योजना सर्वांना लागू करण्यात यावी, सर्व संवगार्तील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे, सर्व इच्छूक अर्जधारकांना एकवेळेची बाब म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्त्या तत्काळ देण्यात याव्या, प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचालकांना किमान १0 हजार रुपये वेतन देण्यात यावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करण्यात यावे, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना सेवाअंतर्गत आश्‍वासीत प्रगती योजनेचा लाभ अनु™ोय करण्यात यावा, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १00 टक्के समायोजन करण्यात यावे, नवृत्तीचे वय ६0 वर्षे करण्यात यावे, तसेच ५ दिवसांचा आठवडा करण्यात यावा अशा २४ मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष एम. सी. चुड्ढहे, उपाध्यक्ष प्रशांत पाठक, सहसचिव आशिष रामटेके, सरचिटणीस लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष पी. जी. शहारे, सचिव सैलेश बैस, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लिलाधर तिबूळे, सरचिटणीस नरेंद्र रामटेककर,विरेंद्र कटरे,मनोज दिक्षीत,एल.यु.खोब्रागडे,अनिरुध्द शहारे,नुतन बांगरे,किशोर डोंगरवार,मनोज मानकर,अजय खरवडे,विजय मडावी,कमलेश बिसेन, यांच्यासह शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...