Monday, 6 August 2018

छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली…जसलोक रुग्णालयात दाखल

मुंबई,दि.6- राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीएमएलए कोर्टात जाताना अचानक भुजबळ यांच्या छातीत वेदना सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार 6 सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासहीत 35 आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नव्या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही? यावर 6 सप्टेंबरला निर्णय होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...