नागपूर,दि.04ः-अर्बन आर्किटेरवर आधारित महा मेट्रो नागपूरचे एयरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९0 फूट असेल. शहरात पहिल्यांदाच अश्याप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. योजना स्टेशनवरील मोकळ्या जागेत सुरक्षासंदर्भात सर्व उपकरने हाताळली जात आहे. एयरपोर्ट स्टेशनवरील प्लॅटफॉर्म ७७.५ मीटर लांबीचा असणार आहे. प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) म्हणजे धातूंच्या साह्याने कारखान्यात तयार केलेल स्ट्रर असून, त्याची कार्यस्थळावर नेऊन उभारणी करणे होय.
मेट्रोच्या साऊथ एयरपोर्ट ते एयरपोर्ट स्टेशन पयर्ंत असणार्या एलिवेटेड सेक्शनवर तयार झालेल्या मेट्रो रुळाचे(ट्रॅक) परीक्षण नुकतेच महा मेट्रो अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. बुलंद इंजिनच्या साह्याने हे परीक्षण झाले आहे. एयरपोर्ट स्टेशनलगतच्या प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) च्या संरचनेवर काम सुरू असून याच्या बांधकामात धातू आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. फॅक्टरीत तयार झालेले प्री-कास्ट स्ट्रर एयरपोर्ट स्टेशनवर आणून बसविले जाणार आहे. आकर्षक पांढर्या रंगाच्या प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) उभारणीकरता विविध प्रकारच्या जड आणि हलक्या साहित्यांचा वापर होणार आहे. कॉलम आणि बीमचे कार्य पूर्ण झाल्यानंतर काँक्रीट पासून स्टेशनची उंची १६.७८ मीटर असेल. एकूण २१0८ चौरस मीटर इतक्या जागेवर हे प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग उभारल्या जात आहे.
एयरपोर्ट स्टेशनवरील कार्ये पूर्ण करत असताना विविध साहित्यांची कटिंग, साहित्यांना आकार देने, साहित्यांना एकत्र करणे व वेल्डिंग सारखे कार्य केले जाते. हि सर्व काम आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाने आवश्यक त्या नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण केली जात आहे. नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
एक अनुभवी सर्मपित अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची फौज हे संपूर्ण कार्य करणार आहे. प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी) स्टेशनची संपूर्ण रचना आधुनिक संरचनेवर आधारित आहे. ज्यामध्ये विशेषत: डिझाइन केलेले आकर्षक बोल्ट्सचा उपयोग करण्यात आले आहेत. आधुनिक शैलीने स्टेशनचे बांधकाम होत असल्याने त्याचा एकूण खर्च ४0 टक्क्याने कमी असेल. तसेच पारंपारिक बांधकामात विटा, लाकूड, रेती व ग्लेझिंगचा वापर देखील होत आहे.
No comments:
Post a Comment