देवरी,दि.4- स्थानिक केशोरी तलावामध्ये एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळले. या प्रकरणी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मृताचे नाव प्रकाश शालिकराम टेकाम (वय50), राहणार संजय नगर देवरी असे आहे.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रकाश हा गेल्या मंगळवारला (दि.31) आठवडी बाजार करून घरी परतला. यानंतर तो घरून परत येतो असे सांगून निघून गेला. मात्र, तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी प्रकाशचा शोध घेतला. मात्र तो कोठेही आढळून न आल्याने त्याच्या नातेवाइकांनी देवरी पोलिसात हरविल्याची तक्रार दिली.
काल शुक्रवारला (दि.3) सायंकाळी साडे सातच्या सुमारास स्थानिक केशोरी तलावात एका इसमाचे प्रेत तरंगताना दिसले असता त्यांची याची सूचना देवरी पोलिसांना दिली. मृतदेह पाण्याबाहेर काढल्यावर पोलिसांनी प्रेताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता प्रकाशच्या कुटंबीयांनी त्याचा मृतदेह ओळखला. पुढील तपास ठाणेदार कमलेश बच्छाव यांचे मार्गदर्शनात देवरी पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment