नवी दिल्ली,दि.05 (वृत्तसंस्था) : बॅंक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने खातेदारांकडून देशातील विविध बँकांनी दंडापोटी कोट्यवधींची कमाई केली आहे. देशातील 21 राष्ट्रीयीकृत बँकांमधील सर्व रक्कम मिळून तब्बल पाच हजार कोटी रुपये बँक खातेदारांकडून वसूल करण्यात आल्याची माहिती बँकिंग अहवालातून मिळाली आहे.
भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेला आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 6,547 कोटींचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. हा तोटा बँकेच्या खातेदारांनी मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या बँकेतून एकत्रित अशी 4, 989.55 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, यातील 2,433.87 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न एसबीआयला झालेल्या तोट्यातून वळती करण्यात येणार आहे.
मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने दंड आकारणारी एसबीआयनंतर एचडीएफसी बँक सर्वात मोठी बँक ठरली आहे. एचडीएफसी बँकेने 2017-18 या आर्थिक वर्षात त्यांच्या खातेदारांकडून 590.84 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, 2016-17 या आर्थिक वर्षात एचडीएफसी बँकेने 619.39 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. त्यानंतर अॅक्सिस बँकेने 530.12 कोटी रुपये तर आयसीआयसीआय बँकेने 317.6 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
No comments:
Post a Comment