गोंदिया,दि.19ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नमाद महाविद्यालयातील ऑडोटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जि.प. गटनेते गंगाधर परशुरामकर, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रिकापुरे, रमेश ताराम, अशोक गुप्ता, किशोर तरोणे, केतन तुरकर, प्रभाकर दोनोडे, मनोज डोंगरे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, जि.प., पं.स., नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment