देवरी,दि.05 - सरपंच सेवा संघाचे पहिले महाअधिवेशन येत्या 27 ऑगस्ट रोजी देवरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या विषयावर देवरी येथे झालेल्या संघाच्या बैठकीत गेल्या मंगळवारी (दि.31) शिक्का मोर्तब करण्यात आले.
स्थानिक पंचायत समितीच्या कृषी भवनात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंचसेवा संघाचे गोंदिया जिल्हाध्य़क्ष कमल येरणे, उपाध्यक्ष मधू अग्रवाल, दिनेश कोरे, सरचिटणीस नितीन टेंभरे, संघटक राजेश पटले आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष सभेच येत्या 27 ऑगस्ट रोजी देवरी येथे होणाऱ्या संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाच्या आयोजनसंबंधी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन करताना या महाअधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी सर्व सरपंच आणि उपसरपंचांनी सहकार्य करण्याचे आवाहन संघाचे पदाधिकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक देवरी तालुका शाखेचे कोशाध्यक्ष विनोद भेंडारकर यांनी केले. उपस्थितांचे आभार रियाज खान यांनी मानले. या सभेला देवरी, आमगाव, सालेकसा, सडक अर्जूनी, मोरगाव अर्जूनी सह इतरही ठिकाणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
No comments:
Post a Comment