गोंदिया,दि.07 - जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजावर बोगस आदिवासी आणि धनगर समाजाच्या अतिक्रमणविरोधात येत्या गुरूवारी (दि.9) सकाळी 11 महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली ही स्थानि इंदिरा गांधी स्टेडिअम पासून निघणार असून या रॅलीचे नेतृत्व डॉ. नामदेवराव किरसान हे करणार आहेत. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार संजय पुराम, माजी आमदार रामरतनबापू राऊत, भरतसिंह दुधनाग, हरिश्चंद्र सलाम, जे.टी. दिहारे, देवराम वडगाये, राजकुमार हिवारे, जगण धुर्वे, पी.बी. टेकाम, प्रसन्न ठाकूर, लक्ष्मण पंधरे, तानेश ताराम, श्रावण राणा, दुर्गाप्रसाद कोकोडे, मुलचंद गावराणे, धनराज तुमळाम, विनोद पंधरे, निलकंठ चिचाम उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, शाखा गोंदिया तसेच खऱ्या आदिवासींच्या ४५ समाज संघटना, संस्था, मंडळाच्याद्वारे नॅशनल आदिवासी पिपल्स, महिला, विद्यार्थी फेडरेशन गोंदिया, आॅल इंडिया आदिवासी एम्लाईज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर शाखा गोंदिया, गोंडवाना मित्र मंडळ आदी आदिवासी संघटनाचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत. ही रॅली शहर भ्रमणकरिता एसडीओ कार्यालयात पोहोचणार आहे.
या महारॅलीत आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment