देवरी: 25
आईएसओ मानांकन प्राप्त आणि आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनींनी ' सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्पांतर्गत देवरी पोलीस स्टेशनला भेट दिली. सदर प्रकल्पाचे आयोजन विविध शालेय संकल्पना आणि शैक्षणिक उपक्रमासाठी आद्य कर्तव्य समजणारे शाळेचे प्राचार्य सुजित टेटे यांनी रक्षाबंधनाचा पार्श्वभूमी वर केले. मागील 3 वर्षापासून सदर उपक्रम ब्लॉसम स्कुल पोलीस स्टेशन देवरी येथे राबवत आहे.
विद्यार्थिनीची शिक्षणातील प्रगती आणि समाजातील स्थान निर्भीड व्हावे तसेच पोलीस विभागाची सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने ब्लॉसम स्कुल मध्ये 'सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
सदर प्रकल्पाला यशस्वीरूप देण्यासाठी देवरीचे कर्तव्यदक्ष आणि विध्यार्थी प्रेमी पोलीस अधिकारी कमलेश बच्छाव, पवार, आणि नितीन शिरपूरकर यांनी प्रत्येक्षात प्रत्येक विभागाची माहिती तसेच विविध कक्ष तसेच पोलीस विभागाची कार्यप्रणाली सविस्तररित्या पटवून दिली. सक्षम बालिका घडविण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टीचे ज्ञान शालेय जीवनात आवश्यक आहे त्यामुळे पोलीस खात्याची माहिती भीती दूर करणे काळाची गरज आहे. पोलीस खाते म्हणजे समाजाचे एक घटक! चोवीस तास समाजाची सेवा करत असतांना सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाही. रक्षाबंधांच्या पर्वावर हि भेट आयोजित केल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून स्नेह द्विगुणित केला. या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विद्यार्थिनी दाखविलेल्या स्नेहाने भारावून गेले. विद्यार्थिनींना त्यांच्या सुरक्षेची हमी यावेळी देण्यात आली.
या भेटीला मूर्तरूप देण्यासाठी पोलीस कर्मचारी, सचिव निर्मल अग्रवाल, शिक्षक नितेश लाडे, राहुल मोहुर्ले, वैशाली टेटे, वैशाली मोहुर्ले, हर्षदा चारमोडे, विश्वप्रित निकोडे आदी शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment