Sunday, 19 August 2018

बुधवारी काम बंद आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर,दि.19ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो ठेकेदारी कामगार व कर्मचार्‍यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत ठेवण्यात आलेले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट पयर्ंत कामगारांना थकित पगार न दिल्यास बुधवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी शिष्टमंडळामध्ये प्रहारचे निशा निरगुडे, सतीश खोब्रागडे, सतीश सांबर, चिंचकर, प्रज्ञा अलीकडे, सतीश घोनमोडे, दिनेश कंपू, किशोर महाजन, देवराव हटवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
थकित वेतन तातडीने मिळण्याच्या मागणीकरिता प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांनी विनावेतन एक तास काम करून एक अभिनव आंदोलन सुद्धा केले होते. परंतु अजून पयर्ंत कामगारांचे थकीत वेतन अदा करण्यात आलेले नाही. याबाबत कामगारांच्या एका शिष्टमंडळाने नगरसेवक देशमुख यांचे नेतृत्वात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.अर्थमंत्र्यांना कामगारांतर्फे एक निवेदन देण्यात आले. सरकारी विभागांमध्ये कार्यरत सर्वच ठेकेदारी कामगारांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते. परंतु अत्यल्प पगारावर शासनाला सेवा देणार्‍या कंत्राटी कामगारांचे वेळोवेळी वेतन थकीत करण्यात येते.
या कामगारांना परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.मागील चार महिन्यापासून मेडिकल कॉलेजमध्ये ठेकेदारी कामगार व कर्मचार्‍यांचा पगार थकीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे.शाळा सुरू झाली, परंतु मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी पगार नाही अशी परिस्थिती या कामगारांची झालेली आहे.कामगारांनी रचनात्मक आंदोलन करून या समस्येकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही उचित कार्यवाही अजून पयर्ंत करण्यात आलेली नाही. ही बाब कामगारांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सरकारी विभागातील सर्वच ठेकेदारी कामगारांचे नियमितपणे वेतन देण्याचे धोरण आखावे अशी मागणी प्रहारचे जिल्हाप्रमुख पप्पू देशमुख यांनी केली.
मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कामगारांच्या थकीत वेतनची उचित चौकशी करून कारवाई करण्याची तसेच शासनाच्या सर्वच विभागातील ठेकेदारी कामगारांना नियमित वेतन देण्याचे धोरण आखण्याचे आश्‍वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...