Tuesday, 7 August 2018

लाखनी येथे भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

लाखनी,दि.07- भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज लाखनी येथे करण्यात आले होते.
लाखनी येथील मंडल स्वागत लॉन सभागृहात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी विदर्भाचे प्रांत संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार बाळा काशिवार, जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख हेमंत देशमुख, उल्हास फडते, नितीन कारेमोरे, दादासाहेब टिचकुले,डॉ. शाम झिंगरे, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, शेषराव वंजारी, पद्माकर बावनकर, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, हरिदास गायधनी, नारायण हटवार, श्रावण कापगते, संदीप भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाला लाखनी मंडळातील बूथ प्रमुख, लोकप्रतिनिधी, क्षेत्रप्रमुख व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...