Saturday 21 September 2019

लोकप्रतिनिधींच्या दबावात कंत्राटी मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्यांना ठेंगा

गोंदिया,दि.20-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाèयांच्या राज्यातील अनेक जिल्ह्यात आलेल्या तक्रारीचे स्वरुप बघता ज्या पंचायत समितीमध्ये किंवा एका विशिष्ट ठिकाणी अधिक कालावधी झाला असेल त्या ठिकाणाहून त्यांचे नियुक्तीचे ठिकणा बदलविण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले होते.त्या अनुषंगानेच नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी १३ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार गोंदिया जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांनी १६ सप्टेंबरला बैठक घेत एकाच ठिकाणी अधिक कार्यकाळ झालेले व तक्रारी असलेल्यां मग्रारोहयोतील कंत्राटी कर्मचाèयांच्या तत्काल बदल्या करण्याचे निर्देश मग्रारोहयो उपजिल्हाधिकारी यांना दिले होते.त्यानुसार 17 सप्टेंबरला पुन्हा झालेल्या एका बैठकीत कंत्राटी कर्मचार्यांना त्यांच्या बदल्या होणार असून आचारसहिंतेचा व बदल्यांचा काही संबध नसल्याचे स्पष्ठ सांगण्यात आले होते.त्यानंतर मात्र एकाच ठिकाणी दबा धरुन बसलेल्या काहींनी आपली बदली थांबावी यासाठी लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली,त्यामध्ये माजी पालकमंत्र्याकडेही काही गेले.माजी पालकमंत्र्यासह विद्यमान आमदारांनी अधिकार्यांना मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्याच करु नका असा संदेश दिल्याने त्या बदल्यांनाच ठेंगा दाखविण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा गवगवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असतानाच त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र पारदर्शकतेला फाटा देत एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष असलेल्यासाठी अधिकार्यांनाच बदल्या करु नका असे संदेश देत असल्याच्या चर्चेने फडणवीस सरकारच्या व जिल्हाधिकारी कार्यालयातील पारदर्शक कार्यक्रमालाच आजपर्यंत तिलांजली देण्याचे काम होत आले असून विद्यमान जिल्हाधिकारी सुध्दा या संघटित कंत्राटी मग्रारोहयो कर्मचार्यांच्या बदल्या करु शकले नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.त्यातच काही कंत्राटी कर्मचारी यांनी आज बदल्या थांबल्या बद्दल माजी पालकमंत्र्यांना भेटून आभार मानल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पारदर्शक योजनेला अपारदर्शकतेची झालर लागल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...