Thursday, 5 September 2019

शेडेपार येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

देवरी,दि.05- तालुक्यातील शेडेपार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील आद्य शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच ज्यांच्या नावे शिक्षक दिन साजरा करण्यात येतो ते भारताचे प्रथम उपराष्ट्रपती मा.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे कार्याची माहिती देण्यात आली.  शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन कार्यक्रमाचे ही यावेळी आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, इच्छुक विद्यार्थ्यांना वर्गाध्यापनाची संधी देण्यात आली
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक  ए बी नंदागवळी,  ए व्ही मेश्राम मॅडम, एम के चव्हाण, डी डी उईके आदींनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...