Thursday 5 September 2019

आमदार अग्रवालांची शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांशी भेट

गोंदिया,दि.05ः-विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसे राजकारणातही घडामोडी घडू लागल्या आहेत.
काँग्रेस पक्षाकडून दोनवेळा विधानपरिषद व तीनवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर सुद्धा सध्या सुरु असलेल्या भाजपच्या ईव्हीएमलाटेसमोर चांगल्या चांगल्या नेत्यांनाही घाम फुटला आहे. त्यातच गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही लोकसभा निवडणुकीतील 38 हजाराचे मताधिक्य आपल्या पराभवाला कारणीभूत ठरु शकते, या भीतीने भाजपप्रवेशासाठी हवी तेवढी पूर्ण तयारी केलेली दिसून येत आहे.त्यातही भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतही संबध चांगले रहावे आणि विधानसभेच्या निवडणुकीत सहकार्य मिळावे, हे उदिष्ठ समोर ठेवून आमदार अग्रवाल यांनी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांची मुंबई येथे भेट घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.भाजप सेनेमध्ये युती पक्की असून गोंदियाची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...