Sunday, 8 September 2019

जुनी पेंशनसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून संपावर


 गेवराई (बीड),दि.08 -  जूनी पेंशन योजना लागू करण्याच्या आपल्या मागणीला घेऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून (दि.09) संपावर जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांची संघटनांनी दिली आहे.
 राज्य शासकीय व निमशासकीय, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती वाशिम यांच्या वतीने विनंती करण्यात येते कि दिनांक ०९ सप्टेंबर २०१९ रोजी जुनी पेंशन योजना लागु करावी या एकमेव मागणीसाठी एकदिवसीय संप करण्यात येणार आहे, तरी बीड जिल्हयातील  १००% कर्मचारी तसेच खाजगी व जि प शाळेतील शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या संपात सामील होण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष विष्णू आडे यांनी केले आहे.
 संपात सहभागी होणाऱ्या.सर्व तालुक्यातील पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी तालुकास्तरावर उपस्थित राहुन तहसीलदार व संबधित अधिकाऱ्यांमार्फत  राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन द्यावे,तसेच जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यानी जिल्हास्तरावर उपस्थित राहुन मा जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यंमत्री यांना निवेदन देण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले. 
 जुन्या पेंशनसाठी समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या एकदिवशीय संपाबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास ११ सप्टेंबर पासुन सर्व कर्मचारी जुनी पेंशनसाठी बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णु आडे आणि समन्वय समिती चे सर्व जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...