Thursday 26 September 2019

लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे- उपविभागीयअधिकारी राठोड

निवडणुक यंत्रणा सज्ज

देवरी,दि. 26- निवडणुक प्रक्रिया ही लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी जागरूक राहून मतदान प्रक्रियेत आपला सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. यासाठी महिला, पुरुष आणि युवा मतदारांनी अग्रक्रमाने मतदान  करावे, असे आवाहन देवरीचे उपविभागीय अधिकारी तथा 66- आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड यांनी केले आहे.
पत्रकारांसाठी बोलाविलेल्या सभेत माहिती देताना श्री राठोड यांनी सांगितले की, 66- आमगाव-देवरी विधानसभा मतदार संघातील सदस्य निवडीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. उद्या 27 तारखेपासून नामांकन दाखल करण्याला सुरवात होत आहे. नामांकन दाखल करण्याची अंतीम तारीख 4 ऑक्टोबर असून दुसऱ्याच दिवसी म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची छाऩनी करण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोबर रोजी नामाकंन मागे घेता येणार असून प्रत्यक्ष मतदान हे 21 ऑक्टोबर आणि मतगणना ही 24 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
या मतदारसंघात निवडणुक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. या प्रक्रियेमध्ये  एकूण 2 लाख 66 हजार 422 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 1 लाख 33 हजार 660 पुरुष आणि 1 लाख 33 हजार 62 महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी एकूण 310 मतदान केंंद्र तयार करण्यात आले असून त्यांनी  24 झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय अतिरिक्त 3 झोनल अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. ही निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजारावर निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा यंत्रणेचे सुमारे पाचशे कर्मचारी असणार आहेत.
मतदारांना आपली ओळख पटवून देण्यासाठी एकूण 11 प्रकारची शासकीय दस्त वापरता येणार आहेत. यामध्ये मतदार ओळख पत्र, पॅन कार्ड. आधारकार्ड, पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, बॅंकेची पासबूक, मनरेगाचे जॉबकार्ड, पेशनकार्ड, श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा कार्ड, शासकीय सेवा कार्ड,आरजीआय ने दिलेले स्मार्टकार्ड यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर वृध्द आणि दिव्यांग मतदारासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अशा मतदारांना मतदान सुलभरीत्या करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर व्हील चेअर, भिंग आणि स्वयंसेवकाची सोय करण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे देवरी येथे पूर्णतः दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यावर विचार सुरू असल्याचेही श्री राठोड यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...